आफ्रिकेत वाटल्या हनुमान चालिसाच्या प्रती   

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील एका प्रमुख हिंदू संघटनेने देशभरातील आठ मंदिरांमध्ये हनुमान चालिसाच्या ६० हजार छोट्या प्रतींचे वाटप केले आहे. गौतेंग प्रांतातील विविध क्लबमधील मोटार सायकलस्वारांच्या नेतृत्वाखाली ’एसए हिंदू’ संघटनेच्या सदस्यांनी रविवारी या प्रतींच्या वितरणाची मोहीम राबवली या सोबत त्यांनी गरजूंना सुमारे दोन टन किराणा मालही दिला. 
 
एसए हिंदूजच्या संस्थापक पंडिता लुसी सिग्बोन म्हणाल्या, मंदिरांना खूप भाविक भेट देताना आणि विशेषत: क्वाझुलु-नाताल सारख्या जवळपासच्या प्रांतातील नागरिक या उपक्रमाला उत्साहाने पाठिंबा देत असल्याचे पाहून आम्हाला खूप आनंद झाला.

Related Articles